केकेचे पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला अन् एका महिलेचे 1.67 लाख रुपये झाले डेबिट; भोसरीतील प्रकरण
लोकवार्ता : केकचे पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणाऱ्या महिलेने 1.6 लाख रुपये गमावले आहेत. मार्च महिन्यात ही घटना घडली होती. पिंपरी चिंचवड परिसरात ही धक्कादायक घटना आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला.
.मोशी येथून 400 रुपयांचा केक एका 30 वर्षीय महिलेने ऑनलाइन मागविला होता. फसवणूक करणाऱ्याने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले आणि त्यानंतर या महिलेचे तब्बल 1.67 लाख रुपये डेबिट झाले आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली.
प्राथमिक तपासानंतर सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी बँकेत हे पैसे ट्रान्सफर झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना लक्षात आले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले, की संबंधित महिलेला केक पाठवायचा असल्याने ती परिसरातील केक झॉपचे नंबर्स शोधत होती. त्यात तिने एक दुकान निवडले आणि 4 मार्च रोजी 400 रुपये किंमतीचा केक ऑर्डर केला. त्यानंतर तिने ऑनलाइन पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, पण हो होऊ शकला नाही. समोरील व्यक्तीने तिला एक कोड सेंड केला आणि तो स्कॅन करून पेमेंट करण्याची विनंती केली. तिने ९२ कोड स्कॅन केला तेव्हा 400 रुपयांचा व्यवहार झाला.
या पहिल्या व्यवहारानंतर लगेचच तिच्या बँक खात्यातून इतर अनेक व्यवहार झाले. काही तासांतच सायबरक्रूकने तिचे बँक खाते 1.67 लाख रुपये ट्रान्सफर करून रिकामे केले, असे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले, की आमच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे, की पैसे दुसऱ्या राज्यातील खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आम्ही बँकेकडून अधिक तपश्लील मागितले आहेत. आमची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहेत.