सक्षमीकरणासाठी महिलांनी उद्योग व्यवसायात भरारी घ्यावी – कीर्ती अग्रवाल
महिला दिन : उडान ग्रुप तर्फे वृक्षारोपण,स्नेहमिलन व संवाद
लोकवार्ता- जालना : स्त्री भ्रूण हत्या, असमानता,शोषण, शिक्षण व रोजगाराच्या संधी यात पूर्वीपेक्षा परिस्थिती सुधारली असली तरी महिलांनी स्वतः च्या सक्षमीकरणासाठी अंगभूत कलांद्वारे उद्योग ,व्यवसायात भरारी घ्यावी .असे आवाहन उडान च्या संस्थापिका कीर्ती अग्रवाल यांनी केले.
उडान ग्रुप च्या वतीने महिला दिन पर्यावरणपूरक साजरा करण्यात आला. जालना शहराजवळील सामाजिक वनीकरण उद्यानात उद्यमशील महिलांनी एकत्रित येत प्रारंभी वृक्षारोपण केले. स्नेहमिलन व संवाद साधला.
कीर्ती अग्रवाल यांनी दर्जेदार उत्पादन, तत्पर सेवा , सचोटी, उत्तम संवाद कौशल्य व सातत्य राखले तर व्यवसाय भरभराटीस येतो. हे महिलांनी सिद्ध करून दाखवले. असे नमूद करत महिलांना स्वयंरोजगारासाठी ग्रुप प्रयत्नशील राहील. अशी ग्वाही कीर्ती अग्रवाल यांनी दिली.
महाएक्सपो च्या यशस्वी आयोजनाबद्दल महिला सदस्यांनी कीर्ती अग्रवाल यांचा जाहीर सत्कार केला तसेच आपापल्या व्यवसायाची माहिती दिली. वयस्कर असलेल्या लता अबोटी यांच्या उद्यमी पणाचा महिलांनी विशेष गौरव केला .
कार्यक्रमास नसीम शेख ,माया शर्मा, दीपा भानुशाली, रेखा भानुशाली, सुजाता मुथा, ज्योती मेरूकर,टिना शाह, ज्योती जोशी, मेघना बदमोरे ,रचना धनानी, वैशाली साळवे यांच्या सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
