“मोशी येथे साकारण्यात येत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात”
-भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व सहकारी यांनी केली पाहणी.
मोशी।लोकवार्ता-
Statue ऑफ हिंदुभूषण अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी मतदार संघातील बोऱ्हाडेवाडी मोशी येथे भव्य पुतळा व शंभू सृष्टीचे काम सुरु आहे.सदर पुतळ्याचे काम जेष्ठ कलाकार राम सुतार सर यांच्या कडे दिल्ली येथे सुरु आहे याची आज भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व सहकारी यांनी पाहणी केली. येत्या काही महिन्यात सदर पुतळा पूर्ण होऊन पिंपरी-चिंचवड येथे आणून उभारणी करण्याचे काम सुरु होईल. यावेळी पाहणी करताना माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका अश्विनी जाधव व सारिका बोऱ्हाडे तसेच नितीन बोऱ्हाडे ,संतोष जाधव उपस्थित होते.

भक्ती-शक्तीच्या अभूतपूर्ण यशानंतर मोशी येथे साकारण्यात येत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच अवाढव्य ,भव्य-दिव्य अशा शौर्याचे प्रतीक म्हणजे हिंदुभूषण छत्रपती श्री.संभाजीराजे यांचे स्मारक . स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पिंपरी-चिंचवडकरांना छत्रपती संभाजी महाराजांच्या विराट रुपाचे दर्शन घडणार आहे .अशी माहिती भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी दिलीं.
