“पिंपरी मध्ये युवा सेनेकडून सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध”
केंद्र सरकारने वाढवलेल्या पेट्रोल व डिझेल यांच्या दरवाडीमुळे पिंपरी मध्ये युवा सेनेकडून सायकल रॅली काढण्यात आली.भगवे झेंडे हाती घेऊन हेच का अच्छे दिन असा सवाल आंदोलकांनी केला.
पिंपरी| लोकवार्ता-
गेल्या काही दिवसांपासून देशात वाढत्या इंधन दरवाढीचा विरोधकांनी चांगलाच निषेध केलेला आहे.आंदोलनही करून इंधनाचे दर कमी झाले नाही म्हणून युवा सेनेनं सायकल रॅली काढून मोदी सरकारला सवाल केलाय .इंधन दरवाढीविरोधात युवा सेना पिंपरी -चिंचवड शहरातर्फे फिनोलेकर चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. युवा सेना मावळ लोकसभा विस्तारक राजेश पळसकर, पिंपरी चिंचवड शहर युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, रूपेश कदम, राजेंद्र तरस, युवती सेनेच्या प्रतीक्षा घुले, माउली जगताप, नीलेश हाके यांच्यासह युवा सैनिक यामध्ये सहभागी झाले होते.

इंधन दरवाढीचा निषेध करताना ‘हेच का अच्छे दिन?’ असा सवाल करणारे फलक रॅलीमध्ये झळकवण्यात आले.इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक त्रस्त असून, महागाई वाढली आहे. ‘अच्छे दिन’चा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.