भोसरी येथे झी टॉकीज प्रस्तुत “गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रमाचे आयोजन
झी टॉकीज व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजन.
भोसरी । लोकवार्ता-
भोसरी येथे झी टॉकीज प्रस्तुत “गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने झी टॉकीज प्रस्तुत, गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा “, या कार्यक्रमांतर्गत “छत्रपती संभाजीराजे चरित्रकथा ” या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ८ ते १० मे २०२२ रोजी झी टॉकीज प्रस्तुत “ करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे व महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका सौ. संन्मीता धापटे शिंदे आहेत. हा कार्यक्रम रोज सकाळी १० ते दुपारी १ .०० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे संपन्न होणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज राजे यांच्या पराक्रमाची गाथा या कार्यक्रमातून उलगडणार आहे. संभाजी राजांना ३२ वर्षे आयुष्य लाभले. या काळात त्यांनी गाजवलेला पराक्रम, शत्रूंशी केलेल्या लढाया, त्यांची प्रशासन व्यवस्था अशा अनेक विषयांची माहिती या चरित्रकथेतून समजणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे व सादरकर्ते प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे.